ठाण्यामध्ये ८ सप्टेंबर साक्षरता दिन मोठ्या उत्साहानं साजरा

ठाण्यामध्ये ८ सप्टेंबर हा साक्षरता दिन मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. युनेस्कोतर्फे ८ सप्टेंबर १९६५ मध्ये तेहरान येथे शिक्षण मंत्र्यांची जागतिक परिषद झाली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या चौदाव्या सर्वसाधारण सभेनं ८ सप्टेंबर १९६७ ला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यास मान्यता दिली. भारतामध्ये २ ऑक्टोबर १९७८ च्या गांधी जयंतीपासून निरक्षरांना साक्षर करण्याची सुरूवात झाली. जिल्ह्यामध्ये १९९६ पासून संपूर्णत: साक्षरता अभियान राबवलं गेलं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून २०११ च्या जनगणनेत जिल्ह्यात साक्षरतेचं प्रमाण ८६ टक्क्यांपर्यंत गेलं. साक्षरता दिनाच्या निमित्तानं साक्षरता ज्योत प्रज्वलित करून साक्षरता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading