ठाण्यामध्ये दस-याच्या मुहुर्तावर १ हजाराहून अधिक वाहनांची खरेदी – परिवहन विभागाला सव्वादोन कोटींचा महसूल

कोरोनाचं सावट सर्व व्यवसायांवर पडलं असतानाच दुसरीकडे मात्र दस-याच्या निमित्तानं प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. दस-याच्या मुहुर्तावर मोठी वाहन खरेदी होत असते. दसरा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक समजला जातो. त्यामुळं दस-याच्या मुहुर्तावर सर्वसामान्य माणूस वाहन खरेदीच्या प्रयत्नात असतो. यंदा कोरोनामुळं सर्वच व्यवसाय संकटात आले होते. त्यातून वाहन विक्रीही सुटली नव्हती. मात्र यंदाच्या दस-याला १ हजाराहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. ऑगस्टपासून अनलॉकला सुरूवात झाल्यानंतर हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. दस-याच्या मुहुर्तावर जिल्ह्यात झालेल्या वाहन खरेदीमुळं प्रादेशिक परिवहन विभागाला जवळपास सव्वादोन कोटी रूपयांचा महसुल मिळाला आहे. जिल्ह्यामध्ये १ हजाराहून अधिक वाहनं विकली गेली असून त्यापैकी ठाण्यातच ७०० हून अधिक वाहनांची विक्री झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading