ठाण्यामध्ये गेल्या २४ तासात २१५ मिलीमीटर पावसाची नोंद

तौक्ते वादळानं ठाण्याला चांगलाच फटका दिला असून या वादळामुळे ठाण्यामध्ये गेल्या २४ तासात २१५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल सकाळी साडेआठ पासून आज सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासात हा २१५ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. या पावसामुळे आणि सोसाट्याच्या वा-यामुळे जवळपास १५९ झाडं ठाण्यात पडली असून २२ ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर १७ झाडं ही धोकादायक ठरली आहेत. पावसाळ्यापासून रक्षणासाठी असणा-या वेदरशेड या ८ ठिकाणी धोकादायक परिस्थितीत आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेकदा शासकीय विभाग हे फारसे काम करताना दिसत नाहीत. अथवा नियंत्रण कक्ष दूरध्वनी घेत नाहीत. मात्र ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलानं कालच्या तौक्ते वादळाच्या हाहाकार परिस्थितीत ठाण्यात अशा परिस्थितीतही उत्तम कामगिरी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading