ठाण्यामध्ये आढळले दोन मोठे अजगर

ठाण्यामध्ये अलिकडेच दोन मोठे अजगर आढळून आले. या अजगरांची त्यांच्या नैसर्गिक निवासात मुक्तता करण्यात आली. सर्पमित्र अतुल उबाळे आणि अमेय मालेगावकर तसंच पीर शेख या तिघांना या अजगरांची माहिती मिळाली होती. एक अजगर घोडबंदर रस्त्यावरील ओवळा इथून तर दुसरा अजगर वाघबीळ इथून पकडला. एका अजगराची लांबी ८ फूट तर दुस-या अजगराची लांबी ही जवळपास १० फूट होती. वनविभागाची परवानगी घेऊन या दोन्ही अजगरांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading