ठाण्यात 2 जानेवारीला जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने जय भवानी व्यायामशाळा एम फिटनेस, लोकमान्यनगर पाडा न.2 आयोजित जिल्हास्तरीय सब ज्युनिअर,ज्युनिअर, सिनिअर आणि मास्टर (पुरुष/महिला) क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा  2 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती असोसिएशनचे सरचिटणीस देवदत्त भोईर यांनी दिली. या स्पर्धेसाठी व्यायामशाळेच्या सहभागी खेळाडूंची प्रवेशिका 28 डिसेंबर पर्यंत ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या व्हॉटसअ‍ॅपवर पाठविणे आवश्यक आहे. फी भरल्याशिवाय प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
व्यायामशाळा संलग्नता फी: 500 रु. (सन 2021साठी ज्यांनी भरलेली नाही ) प्रवेश फी: 300/-
ओळखपत्र फी: 150 रु.(4 वर्षांकरिता डिजिटल कार्ड सह नवीन खेळाडूंसाठी ) वजन गट पुरुष : 53 किलो (सब ज्युनिअर व ज्युनिअर साठी), 59 किलो, 66 किलो, 74 किलो, 83 किलो, 93 किलो, 105 किलो, 120 किलो, +120 किलो. वजन गट महिला: 43 किलो(सब ज्युनिअर व ज्युनिअर साठी), 47 किलो, 52 किलो, 57 किलो, 63 किलो, 69 किलो, 76 किलो, 84 किलो, +84 किलो. जन्मदिनांक:
सब ज्युनिअर: 1 जानेवारी 2003 ते 31 डिसेंबर 2007. ज्युनिअर: 1 जानेवारी 1998 ते 31 डिसेंबर 2002.
सिनिअर : 14 वर्षे पूर्ण असलेला कोणताही खेळाडू. मास्टर 1: 1 जानेवारी 1972 ते 31 डिसेंबर 1981
मास्टर 2: 1 जानेवारी 1962 ते 31 डिसेंबर 1971 मास्टर 3: 1 जानेवारी 1952 ते31 डिसेंबर 1961 मास्टर 4: 31 डिसेंबर 1951 किंवा त्यापूर्वीचा जन्म असावा. आदी माहिती ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोशिएशनचे सरचिटणीस देवदत्त भोईर यांनी दिली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading