ठाण्यात होणारा मराठी गजल मुशायरा कार्यक्रम तूर्तास रद्द

ठाण्यात १५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला गजल मुशायरा कार्यक्रम ओमिक्रॉन व्हेरियंट आणि कोव्हीडच्या वाढत्या पार्श्वभूमीवर तूर्तास रद्द करण्यात आला आहे. तरी सर्व रसिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे महापौरांच्या पुढाकाराने मराठी गजल मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सार्वजनिक, सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांसाठी दिलेल्या निर्बंधामुळे समूह संसर्ग रोखण्यासाठी गजल मुशायरा कार्यक्रम तूर्तास रद्द करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading