ठाण्यात हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम – इतर ठिकाणी दुकानं आणि मार्केट ९ ते ७ पर्यंत सुरू राहणार

ठाणे महापालिकेनंही शासनाप्रमाणे लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये वाढ करताना काही गोष्टींमध्ये शिथीलता आणली आहे. महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी आज लॉकडाऊनबाबत नवीन आदेश जारी केले आहेत. यापूर्वीचा लॉकडाऊन हा ३१ जुलैपर्यंत होता. मात्र आता लॉकडाऊन हा ३१ ऑगस्ट पर्यंत कायम राहणार आहे. मात्र हा लॉकडाऊन हॉटस्पॉट झोनमध्येच लागू राहील. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली असून मॉल, मार्केट, जिम आणि स्विमिंग पूल वगळता सर्व भाजीमार्केटसह दुकानं सम-विषम तत्वावर उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला असलेली दुकानं सम तारखेला तर दुस-या बाजूला असलेली दुकानं विषम तारखेला उघडी ठेवली जाणार आहेत. आत्तापर्यंत दुकानं उघडी ठेवण्यासाठी ५ ची वेळ देण्यात आली होती. मात्र नवीन नियमांनुसार सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवता येणार आहेत. हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये मात्र वेळोवेळी जाहीर केल्यानुसार पूर्वीचे निर्बंध लागू राहणार आहेत. म्हणजे ठाणे शहरातही राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. हॉटस्पॉट वगळता इतर सर्व ठिकाणी ही शिथिलता लागू करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading