ठाण्यात सापडला एक मोठा अजगर

ठाण्यामध्ये आज एक मोठा अजगर सापडला. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील एका कच-याच्या डब्यात हा अजगर आढळला. गेले काही दिवस नाट्यगृह लॉकडाऊनमुळे बंद आहे. त्यामुळं नाट्यगृहातील वावर कमी झाला आहे. पावसामुळे डोंगरातील प्राणी जंगलातून रस्त्यावर येत असून असाच हा अजगर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील कच-याच्या डब्यामध्ये जाऊन बसला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे. सर्पमित्र अनिल कुबल आणि अजय लोखंडे यांनी या मोठ्या अजगराला कच-याच्या डब्यातून बाहेर काढलं. आता त्याला लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading