ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी आज अचानक महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलला भेट देऊन रूग्णालय व्यवस्थापन तसंच वैद्यकीय व्यवस्थापनाचा आढावा घेतला. तसंच आयसीयू युनिटची तपासणी करून तेथील व्यवस्थेचाही आढावा घेतला. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पालिका आयुक्तांनी कोविड रूग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील डॉक्टरांशी चर्चा केली तसंच उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याकडून सर्वसाधारण रूग्णालय व्यवस्थापनाची माहिती घेतली. आयसीयू युनिटची तपासणी करून किती रूग्ण उपचार घेत आहेत आणि किती बेडस् उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला. तसंच उपचारासाठी येणा-या रूग्णांची कुठलीही गैरसोय झाल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही पालिका आयुक्तांनी यावेळी बोलताना दिला.