ठाण्यात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी परिवहन सेवा मोफत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून ठाण्यात राहणाऱ्या 75 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सेवेचा लाभ 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.या सवलतीचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी बी-कॅबिन पास केंद्र, कळवा आगार, वागळे आगार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगार, आनंदनगर आगार, ठाणे स्थानक येथे अर्ज उपलब्ध करुन देण्यात येतील.कागदपत्रांची पुर्तता झाल्याची खातरजमा केल्यानंतर संबंधितांस मोफत प्रवासाचे ओळखपत्र वितरीत करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading