ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या आरास स्पर्धेत शिवगर्जना मित्र मंडळास प्रथम क्रमांक

ठाणे महापालिकेच्या विद्यमाने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत उथळसरमधील शिवगर्जना मित्र मंडळाच्या हस्तकला आणि ओरेगामी कलेपासून सजावटीला प्रथम क्रमांक पटकाविला. तर स्वच्छता पुरस्काराचे प्रथम पारितोषिक पारशीवाडीतील नवयुग मित्र मंडळाला आणि उत्कृष्ट मूर्तीचे प्रथम पारितोषिक कळव्यातील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मिळाले. या स्पर्धेत ठाण्यातील 13 मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण करताना मूर्ती, सजावट, विषय मांडणी, हेतुपूर्ती, शिस्त, स्वच्छता तसेच कलावंतांचे काम या सर्व घटकांचा विचार करण्यात आला.
द्वितीय क्रमांक शिवसम्राट मित्र मंडळाच्या साथीचे रोग आणि काळजी या देखाव्यास तर तृतीय क्रमांक जयभवानी नगरमधील सार्वजनिक उत्सव मंडळाच्या शिवसेना कोणाची या सजावटीस मिळाला.
स्वच्छता पुरस्कारासाठी द्वितीय पारितोषिक ओमशक्ती विनायक मित्र मंडळाने तर तृतीय पारितोषिक कोलबाड मित्र मंडळाने पटकाविले. उत्कृष्ट मूर्तीकार म्हणून प्रथम पारितोषिक गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मूर्तीकार निळकंठ मोरे, वितीय पारितोषिक श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाचे राकेश गोष्टीकर तर तृतीय पारितोषिक जयभवानी मित्र मंडळाचे मिलिंद सुतार यांना मिळाले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading