ठाण्यात येत्या रविवारी ऑनलाईन बुध्दीबळ स्पर्धेचं आयोजन

ठाण्यात येत्या रविवारी ऑनलाईन बुध्दीबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन तर्फे ही ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा भारतातील सर्व खेळाडूंसाठी खुली आणि विनामूल्य असणार आहे. कोणत्याही खेळाडूला ह्या स्पर्धेत भाग घेता येईल. त्यासाठी 90047 67684 आणि 88795 88399 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर अर्ज द्यावा लागणार आहे. आत्ताच 1500 खेळाडूंनी नावे नोंदवली आहेत. तर लिचेसवर 1246 जणांनी नवे नोंदविली आहेत. स्पर्धेतील 70 विजेत्यांना 25 हजार रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. खुल्या गटासाठी एकूण 15 पारितोषिके, तसेच वयोगट १३, १६, १९ आणि उत्कृष्ठ महिला गटासाठी प्रत्येकी ४ पारितोषिके आणि रोटरी फॅमिली मेंबर्ससाठी १० पारितोषिके दिली जाणार आहेत. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनचे अध्यक्ष रोटेरिअन नितीन केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading