ठाण्यात प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे मॉकड्रिल – आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज

ठाणे शहरात मान्सून सुरु होण्यापूर्वी धोकादायक इमारतीमध्ये दुर्घटना घडल्यास तात्काळ करावयाच्या उपाययोजनांची रंगीत तालीम घेण्याबाबत पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने आज नौपाड्यातील नंदिनी निवास या रिक्त इमारतीमध्ये मॉकड्रिल घेण्यात आले. या ठिकाणी इमारत कोसळून २ मजूर अडकल्याचे कळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग कशा पद्धतीने काम करते याची रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये १० आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा, २ ऍम्ब्युलन्स, टीडीआरएफच १५ जवान, अग्निशमन विभागाचे ३० कर्मचारी तसेच महानगर गॅस कर्मचा-यांचा समावेश होता. ठाण्यात धोकादायक इमारतीमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास आरोग्य विभाग, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस यंत्रणा तसेच टीडीआरएफ या सर्वच यंत्रणांची तयारी कशी आहे, ते किती वेळात प्रतिसाद देतात. या प्रतिसादानंतर त्यांनी कशी तयारी केली आहे? आपल्या सर्व सामुग्रीची ते किती चपळाईने हाताळणी करतात ? हे सर्व या मॉकड्रिलमधून पाहण्यात आले. एकूणच शहरात कोणतीही दुर्घटना घडल्यास घटनस्थळी जावून नागरीकांच्या जिवीताचे रक्षण करणे तसेच वित्तहानी टाळण्यासाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापनची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading