ठाण्यात धाडसी दरोडा – ६० लाखांच्या रोकडसह १ कोटी २६ लाखांचे दागिने लंपास

ठाण्यामध्ये शस्त्रांचा धाक दाखवून जवळपास २ कोटी रूपयांचा दरोडा पडला आहे. ठाण्याजवळील काल्हेर या गावात माजी सरपंच जगदिश पाटील यांचा बंगला चारजणांनी शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून लुटला. जगदिश पाटील यांची बीसी अपार्टमेंट ही इमारत असून तिच्या पहिल्या मजल्यावर ते कुटुंबियांसमवेत राहतात. जगदिश पाटील सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडले. ते बाहेर पडताच चौघे लुटारू घरात शिरले आणि त्यांनी पत्नी आणि मुलीला बांधून ठेवून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली. या चौघा लुटारूंनी घरातील ६० लाखांची रोकड, १ कोटी २६ लाखांचे ४२१ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण १ कोटी ८६ लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading