ठाण्यात दोन दिवस पाणी नाही

ठाण्यात उद्यापासून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जांभूळ जलशुध्दीकरण येथील जलवाहिन्यांची तातडीने देखभाल दुरूस्ती करणेसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्या म्हणजे ७ जानेवारीला रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत 24 तासांसाठी शटडाऊन घेण्याचे ठरविण्यात आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या कळवा, खारेगांव, पारसिकनगर, आतकोनेश्वर नगर, घोलाईनगर, रेतीबंदर, विटावा, मुंब्रा, दिवा, ‍ शिळ, कौसा, डायघर, देसाई तसेच इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्र.1 या ठिकाणी एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा 24 तास पुर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेअंतर्गत श्रीनगर जलकुंभ येथील जलवाहिनीवरील इनलेट एअर व्हॉल्व बदली करणे, विवियाना जलकुंभाच्या इनलेट जलवाहिनीस क्रॉस कनेक्शन करणे, महात्मा फुले नगर येथील मुख्‌य जलवाहिनीवरील पाण्याची गळती काढणे इत्यादी कामे करणेसाठी शुक्रवारी ८ जानेवारीला सकाळी ९ ते शनिवार सकाळी ९ वाजेपर्यत २४ तासांसाठी बंद करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या सिध्देश्वर, जॉन्सन, समतानगर, इटर्निटी, जेल परिसर, साकेत, ऋतूपार्क, घोडबंदर रोड, कोठारी कंपाऊंड, इंदिरानगर, लोकमान्यनगर, गांधीनगर, किसननगर, श्रीनगर, वागळे इस्टेट, कळव्याचा काही भाग आणि मुंब्र्याचा काही भाग इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा 24 तास पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading