ठाण्यात गेल्या २४ तासात ९७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ठाण्यामध्ये गेले तीन दिवस पावसानं चांगली हजेरी लावली आहे. आजही सकाळपासून पावसाची हजेरी आहे. आज सकाळी साडेआठ पासून दुपारी साडेतीन पर्यंत २१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मात्र यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याचं दिसत आहे. गेल्यावर्षी याच काळात ११३१ मिलीमीटर पाऊस झाला होता. या तुलनेत यंदा ६८८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. म्हणजे यंदा ४४३ मिलीमीटर कमी पाऊस झाला आहे.