ठाणे महापालिका क्षेत्रात जूनमध्ये मलेरियाचे २८ रूग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जूनमध्ये डेंग्यूची संशयित रुग्णसंख्या 40 आणि निश्चित निदान झालेले शून्य रुग्ण आहेत. तर मलेरियाचे 28 रुग्ण आढळून आले तसंच चिकनगुनियाचे संशयित आणि निश्चित निदान केलेली रुग्णसंख्या शून्य आहे, यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन एकूण 31 हजार 427 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 307 घरे दूषित आढळून आली. तसेच एकूण 41 हजार कंटेनरची तपासणी केली असता 359 कंटेनर दूषित आढळून आली. या अनुषंगाने दरम्यानच्या कालावधीत 50 हॅण्डपंप, ट्रॅक्टर्स-10, ई रिक्षा 6, 10 बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात 2 हजार 194 ठिकाणी औषध फवारणी आणि धुरफवारणी हॅण्डमशीनद्वारे 14 हजार 765 ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली, तसेच 3 ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचे कार्यक्रम राबविण्यात आल्याचे उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिताली हुमरसकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading