ठाण्यात काल ४५१ सार्वजनिक तर ५ हजार ५२७ घरगुती गणपतींना ढोलताशांच्या गजरात, बँडच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात निरोप

ठाण्यात काल ४५१ सार्वजनिक तर ५ हजार ५२७ घरगुती गणपतींना ढोलताशांच्या गजरात, बँडच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात निरोप देण्यात आला. जोरदार पाऊस सुरू असतानाही गणेश भक्त तितक्याच उत्साहाने ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुकीत सामील झाल्याचं दिसत होतं. गेले दोन वर्ष विसर्जन मिरवणुकांवर निर्बंध असल्याने यावर्षी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी दहा दिवसांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मासुंदा तलाव येथील विसर्जन घाटावर उपस्थिती लावून गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. काल ५ हजार ५२७ घरगुती गणेशमुर्ती, ४५१ सार्वजनिक तसेच ८ गौरींचे विसर्जन करण्यात आले. मासुंदा आणि आहिल्यादेवी होळकर येथील कृत्रीम तलावामध्ये यावर्षी १७७ घरगुती आणि २३ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. दत्तमंदिर घाट येथे ३११ घरगुती, १० सार्वजनिक गणपती, खारेगाव कृत्रीम तलावात १९५ घरगुती, १७ सार्वजनिक गणपती, निळकंठवुडस् येथे २६६ घरगुती, ४ सार्वजनिक, आंबेघोसाळे ११४ घरगुती गणेश मुर्तीं , रेवाळे कृत्रिम तलाव येथे १२३ घरगुती, १२ सार्वजनिक गणेश मुर्ती , खिड़काळी तलाव येथे ९४ घरगुती, ४ सार्वजनिक गणपती, शंकर मंदीर तलाव येथे ९१ घरगुती, २५ सार्वजिनक गणेश मुर्ती उपवन तलाव येथे ६४१ घरगुती,५० सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.पारसिक विसर्जन महाघाट येथे ६४२घरगुती,९३ सार्वजनिक गणेश मुर्ती, गायमुख घाट १ येथे ४६४ घरगुती गणेश मूर्ती, ६ सार्वजनिक गणेश मुर्ती तसेच गायमुख घाट २ येथे ४० घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मिठबंदर घाट येथे १६२ घरगुती, ३१ सार्वजनिक गणेश मुर्तीं तर रायलादेवी घाट १ येथे ३६० घरगुती गणेश मुर्ती रायलादेवी घाट २ येथे ४९८ घरगुती गणेश मुर्तीचे, कोलशेत घाट २ येथे ५४२ घरगुती, ६८ सार्वजनिक गणेश मुर्ती , रेवाळे तलाव येथे १२३ घरगुती गणेश मूर्ती, १२ सार्वजनिक गणेश मूर्तींचे, आत्माराम बालाजी घाट येथे १८ घरगुती गणेश मूर्ती , ३ सार्वजनिक गणपतींचे, काकडे घाट येथे ५७ घरगुती गणेश मूर्तींचे ७ सार्वजनिक गणेश मुर्तीं, शंकर मंदिर तलाव येथे ९१ घरगुती, २५ सार्वजनिक गणेश मूर्ती तसेच दिवा विसर्जन घाट येथे ६३२ घरगुती गणेश मुर्ती, ९२ सार्वजनिक गणपती तर ८ गौरींचे विसर्जन करण्यात आले. खिडकाळी तलाव येथे ९४ घरगुती गणेश मुर्तींचे तर ४ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. पर्यायी विसर्जन प्रक्रियेला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज होती. यामध्ये स्वयंसेवक, महापालिकेचे सुरक्षारक्षक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading