ठाण्यात उद्या ४०० जणांच लसीकरण – अनावश्यक गर्दी न करण्याचं पालिकेचं आवाहन.

ठाणे शहरामध्ये उद्यापासून कोविड लसीकरणाचा शुभारंभ होत असून लसीकरणासाठीचा संदेश आल्याशिवाय अनावश्यक गर्दी करू नये असं आवाहन महापालिका आयुक्त आणि महापौरांनी केलं आहे. शहरातील रोझा गार्डनिया, कोरस, कळवा आणि कौसा आरोग्य केंद्र अशा एकूण ४ केंद्रांवर ही लसीकरण मोहिम सुरू होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ४०० आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचा-यांना ही लस दिली जाणार आहे. या लसीकरणासाठी महापालिकेतर्फे २० केंद्रं उभारण्यात आली आहेत. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ज्यांना लसीकरणाविषयी संदेश आला आहे त्यांनीच निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये लसीकरणासाठी उपस्थित रहायचं आहे. नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading