ठाण्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात

ठाण्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मेसर्स साकेत इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेडची मारूती एर्टीगा गाडी चालक प्रलय सामंता हे नवी मुंबईहून भिवंडीकडे जात होते. पूर्व द्रूतगती महामार्गावर कोपरी पूल येथे गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने ते खाली पडले. ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कोपरी पोलीसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. तर दुस-या एका घटनेत आज सकाळी ६ वाजतात टाटा मोटर्सचा कंटेनर चालक सारिक जमाल अंधेरीहून गुजरातकडे घेऊन जात असताना पूर्व द्रूतगती महामार्गावर कॅडबरी जंक्शनजवळ महामार्गावरून खाली आला. ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि राबोडी वाहतूक पोलीसांनी त्वरीत घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले. सुदैवानं या दोन्ही घटनेत कोणतीही हानी झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading