ठाण्यात अंधांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन

रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि विहंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने शहरामध्ये अंधांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. 26 आणि 27 नोव्हेंबरला शहरातील रेमंड ग्राउंडवर या स्पर्धा होणार आहेत. राज्यातले अंध क्रिकेटपटूंचे आठ संघ या स्पर्धांमध्ये सहभागी होतील. रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल च्या वतीने दरवर्षी या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. १२० पेक्षा अधिक अंध क्रिकेटपटू अतिशय उत्साहाने या दोन दिवसीय स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि खेळाचा आनंद लुटतात. 26 नोव्हेंबरला या स्पर्धा सुरू होणार असून एकंदर 7 सामने खेळवले जाणार आहेत. 27 नोव्हेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये रोख रक्कम आणि ट्रॉफी या स्वरूपामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्या संघाला सन्मानित केलं जाणार आहे. तसंच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट फिल्डर, अशा बक्षीसांची लयलूटही केली जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या राहण्याची आणि जेवणाची सोय रोटरीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading