घोडबंदर रस्त्यावरील एका इमारतीमध्ये एअर कंडीशनरच्या आऊट डोअर युनिटला आग

घोडबंदर रस्त्यावरील एका इमारतीमध्ये एअर कंडीशनरच्या आऊट डोअर युनिटला आग लागली होती. सुदैवानं यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही. आज सकाळच्या सुमारास घोडबंदर रस्त्यावरील साईबाबा विहार कॉम्प्लेक्समधील तुलीप इमारतीत राहणा-या संजीवकुमार नायडू यांच्या घरातील एअर कंडीशनरच्या आऊट डोअर युनिटला आग लागली होती. ही माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवानांनी तात्काळ धाव घेऊन आग पूर्णपणे विझवली असून  परिस्थिती नियंत्रणात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading