ठाण्यातील ६ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस पदकं जाहीर

उद्या प्रजासत्ताक दिन साजरा होत असून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ठाणे पोलीस आयुक्तालयातील ६ अधिकारी-कर्मचा-यांना पोलीस पदकं जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती पदक, उत्कृष्ट सेवा पदक, गुणवत्तापूर्ण सेवा पदकं देऊन पोलीसांचा गौरव केला जातो. ठाण्यातील गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त निवृत्ती कदम यांना राष्ट्रपतींचं पोलीस पदक जाहीर झालं आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उपअधिक्षक संगीता शिंदे अल्फान्सो यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पदक जाहीर झालं आहे. तर भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय डोळस यांना आणि खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक रमेश कदम यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर झालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading