ठाण्यातील सुशोभीकरण, स्वच्छता आणि खड्डे बुजविण्याच्या कामाची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात सुरु असलेल्या सुशोभीकरण, स्वच्छता आणि खड्डे बुजविण्याच्या कामाची आज महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी पाहणी केली. महापालिका आयुक्तांनी आनंदनगर चेक नाका, कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका तसेच एलबीएस मार्ग येथील सुशोभीकरण, स्वच्छता आणि खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी पावसामुळे रस्त्याच्या बाजूला साचलेला कचरा, माती तसेच पडलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. दरम्यान एलबीएस मार्गावरील रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करून पावसाचे प्रमाण कमी झाले झाल्याने पेव्हरब्लॉक पद्धतीने तात्काळ रस्ता करण्याचे निर्देशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading