ठाण्यातील सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेश बेडेकर यांनी बोस्टन मॅरेथॉन स्पर्धा केली पूर्ण

ठाण्यातील सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेश बेडेकर यांनी यंदा बोस्टन मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली आहे. त्यांनी ३ तास २० मिनिटं आणि १८ सेकंदात ही मॅरेथॉन पूर्ण केली आहे. त्यामुळे ६ महत्वाच्या आणि मोठ्या मॅरेथॉन पूर्ण करणारे महेश बेडेकर हे ठाण्यातील पहिले डॉक्टर ठरले आहेत. गेली २ वर्ष कोरोनामुळे मॅरेथॉन स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या. गेल्या वर्षीही महेश बेडेकर या स्पर्धे व्हर्च्युअली सहभागी झाले होते. आत्तापर्यंत डॉ. महेश बेडेकर यांनी बर्लिन, न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, शिकागो आणि आता बोस्टन या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते. ६ मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणारे डॉ. महेश बेडेकर हे ठाण्यातील पहिले डॉक्टर आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading