ठाण्यातील सुंदर आणि स्वच्छ गृहसंकुलांच्या स्पर्धेत श्रवण एबी सोसायटीला प्रथम क्रमांक

ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि एमसीएचआयच्या बेस्ट सोसायटी स्पर्धेमध्ये ठाण्यातील श्रवण एबी सोसायटीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या गृहसंकुलांचा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ठाणे शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण व्हावी तसेच, स्वच्छतेत ठाणे शहराचा नावलौकिक व्हावा या हेतुने ही स्पर्धा आयोजित केल्याचे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाला अनुसरून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि एमसीएचआयच्या वतीने बेस्ट गृहनिर्माण संस्थेबरोबरच स्वच्छतेला प्राधान्य देऊन ठाणे जिल्हयातील सोसायट्यांसाठी स्पर्धा घेण्यात आली होती. नुकत्याच पार पडलेल्या एमसीएचआय गृहप्रदर्शनात ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांचा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत ठाण्यातील श्रवण एबी सोसायटीने प्रथम क्रमांक, रुस्तुमजी अजिनो एबीसी सोसायटीने द्वीतिय तर शुभारंभ फेज 2 सोसायटीने तृतीय क्रमांक पटकाविला. तर मोहन हायलँड, स्वस्तिक पाल्म सोसा. फेरीटेल टी वन, रहेजा गार्डन, दोस्ती ग्रेशिया आदी सात विजेत्या सोसायट्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading