ठाण्यातील सभेला अपेक्षित गर्दी न जमा झाल्यानं ठाण्यात येऊनही प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेणं टाळलं

वंचित आघाडीच्या ठाण्यातील सभेला अपेक्षित गर्दी न जमा झाल्यानं ठाण्यात येऊनही प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेणं टाळलं. कालच आंबेडकर यांचं हेलिकॉप्टर उतरू न दिल्यामुळं बदलापूरात आंबेडकरांना सभा घेता न आल्याचा आरोप वंचित आघाडीतर्फे करण्यात आला होता. पण ठाण्यातील सभेला मात्र हेलिकॉप्टरसाठी परवानगी देण्यात आली होती. या सभेसाठी प्रकाश आंबेडकर हे ठाण्यात आलेही होते. हेलिकॉप्टरनं ठाण्यात आल्यानंतर त्यांनी सत्कार हॉटेलमध्ये जाणं पसंत केलं. शिवाजी मैदान येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांच्या प्रचारार्थ आंबेडकर यांची सभा होणार होती. मात्र सभेला अपेक्षित गर्दी जमा होत नसल्याचं पाहून त्यांनी सभेला जाण्याऐवजी मुंबईला जाणं पसंत केलं. प्रकाश आंबेडकर यांनी सभेकडे पाठ फिरवल्यामुळे एमआयएमचे वारिस पठाण यांनी सभेला मार्गदर्शन केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading