ठाण्यातील लामिया तारवाडी या १८ वर्षीय युवतीला सब ज्युनियर गटात गोल्ड तर ज्युनियर गटात वेटलिफ्टींगमध्ये रौप्य पदक

ठाण्यातील लामिया तारवाडी या १८ वर्षीय युवतीनं सब ज्युनियर गटात गोल्ड तर ज्युनियर गटात वेटलिफ्टींगमध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग चॅम्पियनशीप स्पर्धा औरंगाबाद येथे नुकतीच झाली. या स्पर्धेत ७२ किलो वजनी गटात लामिया तारवाडीनं हे यश संपादन केलं आहे. तिच्या सोबत युनायटेड स्पोर्टस् क्लबचे प्रथम पलांडे, निता चापळे आणि प्रशांत ढोंबे हे खेळाडूही राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत निवडले गेले आहेत. उत्तरप्रदेशमध्ये १७ ते २१ मार्च दरम्यान राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा होणार आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते अनंत चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे चौघे खेळाडू सध्या सराव करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading