ठाण्यातील ज्येष्ठ वास्तु रचनाकार वसंत पानसरे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ठाण्यातील ज्येष्ठ वास्तु रचनाकार वसंत पानसरे यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. ठाण्यातील प्रमुख वास्तूंसाठी वास्तुविशारद म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. गडकरी रंगायतन, महापालिका मुख्यालय, दादोजी कोंडदेव स्टेडीयम, ठाणे कॉलेज यासारख्या शहरातील महत्वाच्या इमारती घडवण्यात त्यांचं योगदान आहे. जे जे महाविद्यालयातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर जवाहर बाग स्मशानभूमीत काल रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading