ठाण्यातील एक ज्येष्ठ नागरिक शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं असून त्यांनी ही चढाई त्यांची पत्नी स्वर्गीय अंजली कुलकर्णी यांना समर्पित केली आहे. अंजली कुलकर्णी यांनी २०१९ मध्ये त्यांच्या एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान आपले प्राण गमावले होते. शरद कुलकर्णी यांनी सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे यशस्वीरित्या सर केली आहेत. त्यांच्या या यशस्वी मोहिमेमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.