युपीएससी परीक्षेत प्रथम आलेल्या कश्मिरा संखेने घेतली महापालिका आयुक्तांची भेट

ठाण्याची डॉ.कश्मिरा संखे युपीएससी परीक्षेत राज्यात पहिली आली आहे. युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये ठाण्याच्या डॉ.काश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवत ठाणेकरांच्या  मानाचा तुरा रोवला आहे. त्या स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत. स्वतःचा डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश मिळवले आहे. आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आईवडीलांना दिले असून आता IAS ऑफिसर बनून देशाची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काल कश्मिरा संखेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तर आज ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading