आपल्या दुकानावर झालेली कारवाई ही पालिका स्तरावर – प्रशांत सकपाळ

आपल्या दुकानावर झालेली कारवाई ही पालिका स्तरावर झाली असून ती आजूबाजूच्या दुकानावर सुध्दा झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा प्रशांत कॉर्नर दुकानाचे मालक प्रशांत सकपाळ यांनी केला आहे. दोन दिवसापूर्वी महापालिकेकडून प्रशांत कॉर्नर या दुकानाबाहेरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली होती. त्यावरून बरीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांचं नाव घेतलं जात आहे. त्याविषयी बोलताना प्रशांत सकपाळ यांनी हा खुलासा केला. शिंदे यांच्या कुटुंबातील वृषाली शिंदे यांच्या नावाचे पत्रक काढून त्यामध्ये केलेला उल्लेख चुकीचा आहे. वृषाली शिंदे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आणि त्या आमच्या दुकानात कधी आलेल्याही नसून आपण त्यांना ओळखतही नसल्याचं सकपाळ यांनी सांगितलं. आपल्या नावाचा आधार घेऊन या प्रकरणाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबाचे नाव जोडून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र करत आहेत त्यांनी हे प्रकार थांबवावे असंही प्रशांत सकपाळ यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading