ठाण्यात एकाच दिवशी गोळीबाराच्या दोन घटना घडल्यानं खळबळ

ठाण्यामध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार होण्याचे प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. ठाण्यातील घंटाळी मंदिर परिसरात पहाटेच्या सुमारास गोळीबार झाला. या गोळीबारात एकजण जखमी झाला. दोन गटांमध्ये संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घंटाळी परिसरात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला. संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं समजतं. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, त्याच्यासोबत त्याचे सहकारीही होते. आपल्या कार्यालयातून ते रात्रीच्या वेळी ते कंदील पुरवण्याचं काम करत होते. त्याचवेळी हल्लेखोर तिथे पोहोचले आणि गोळीबार केला. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घंटाळी परिसर हा नौपाडा या मध्यवर्ती भागामधील गजबजलेल्या भागांपैकी एक आहे. या भागामध्ये सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. घंटाळी मंदिराच्या मागील बाजूस शाळा आहे. त्यामुळे अशा ठिकाणी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. दुसरा प्रकार वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हणजे येऊर येथे झाल्याचं सांगितलं जातं. गोळीबार करणारे आणि गोळीबार झालेले दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं सांगितलं जातं. या व्यक्तीच्या छातीत गोळी लागली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading