ठाण्यातील खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर

पालकमंत्र्यांच्या खड्डे भरण्याच्या आदेशामुळे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली असून शहरातील खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. संततधार पावसामुळे शहरात विविध ठिकाणी खड्डे झाले आहेत. हे खड्डे तातडीने भरण्याच्या सूचना महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केल्या होत्या. त्यानुसार पावसाची उघडीप मिळताच महापालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे खड्डे कोल्डमिक्सचा वापर करून भरण्यात येत असून आज सकाळपासून वागळे प्रभाग समितीतंर्गत ॲपलॅब सर्कल आणि इतर ठिकाणी खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने प्रभाग समितीनिहाय खड्डे भरण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान खड्डे भरणीच्या कामासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे अशा सूचना नगर अभियंता रविंद्र खडताळे यांना दिल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading