ठाण्यातील कोरोना रुग्णालयात समुपदेशकांची नियुक्ती करणार

कोरोनाचा धसका घेतल्यामुळे रुग्णांची मानसिक स्थिती बिघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील रुग्णालयांमध्ये पालिकेच्या वतीने समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त विपिन शर्मा यांनी दिले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल नागरिकांना दिलासा देण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांची मानसिक स्थिती बिघडल्याची काही उदाहरणे आढळली. कोरोना संदर्भात रुग्णांची काळजी घेतली जाते. मात्र त्यांच्यावर रुग्णालयात मानसिक उपचार होत नाहीत. रुग्णालयातील वातावरणामुळे रुग्णांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यानंतर पालिकेच्या वतीने रुग्णालयांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येईल. पीपीई किट घालून समुपदेशकांकडून प्रत्येक रुग्णाशी संवाद सादला जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सतर्कता बाळगावी, कोरोना रोखण्यासाठी सध्या वापरात येणाऱ्या रेमडेसिवीर, टोसिझूमैब औषधांचा साठा पालिकेने मागवावा, खाजगी रुग्णालयांमध्ये सुरू असलेली रुग्णांची लूट रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. या संदर्भात महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading