ठाण्यातील दोन ज्येष्ठ विधीज्ञांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ठाणे जिल्हा वकील संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंमेलनात हा गौरव करण्यात आला. न्यायालयामध्ये ४० वर्षाहून अधिक वकीली करणा-या
ए. डी. चव्हाण आणि विजय साळी या दोघांचा जिल्हा न्यायाधीश डी. जी. मुरूमकर यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.