ठाण्यातील एका तरूणाची फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्या

ठाण्यातील एका तरूणानं फेसबुकवर आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. टेंभीनाका येथे राहणा-या या तरूणाचं नाव मंदार भोईर आहे. मंदार हा गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होता. सोमवारी पहाटे कुटुंबिय झोपेत असताना घरातील स्वच्छतागृहात जाऊन त्यानं गळफास लावला. घरातील सर्वजण उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मंदार याने आत्महत्येपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यात त्याने आपण आयुष्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. काही चूक झाली असल्यास माफ करा तसंच आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असं त्यानं म्हटलं आहे. मंदार हा महापालिकेच्या नोकरीत होता. मात्र गेले काही दिवस तो कामावर जात नसल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading