ठाण्यातील आठवीत शिकणाऱ्या आर्या मेंगाळेने बनवला रोबोट

ठाण्यातील आठवीत शिकणाऱ्या आर्या मेंगाळे हिने एक रोबोट बनवला असून यामुळे ती सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे. पाचपाखाडीतील सरोवर दर्शन मध्ये राहणा-या आर्या मेंगाळे हिने लॉकडाऊनमध्ये आपल्या वेळेचा उत्तम सदुपयोग करून घरातील मर्यादित स्त्रोतांमधून रोबोट बनविला आहे. हा रोबोट 6 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतो. हॉस्पिटल, शॉपिंग मॉल्स, मेडिकल स्टोअर्स, गृहनिर्माण संस्था अशा ठिकाणी या रोबोटचा वापर होऊ शकतो. रोबोटमध्ये 360 डिग्री कॅमेरा आहे. त्यामध्ये मोबाइल इंटरफेसही असून तो रोबोटसह संभाषण सुलभ करतो. पुढे जाऊन तिला थर्मल कॅमेरा बनवायचा आहे जो मानवी शरीराचे तापमान मोजण्यात मदत करू शकेल. आर्या श्री माँ विद्यालयात आठवीत शिकत आहे. तिला रोबोटिक्स मध्ये काही करायची इच्छा असून तिला भविष्यात इंजिनियर व्हायचे असल्याचं तिने सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading