ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता

ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता आहे. अंतर्गत मेट्रो प्रकल्पाऐवजी ट्राम सेवा उभारली जाण्याची शक्यता आहे. मात्र ही ट्राम जुन्या जमान्यातील नसून नव्या जमान्यातील वेगवान ट्राम असणार आहे. जुन्या जमान्यातील ट्राम ही तासाला १५ किलोमीटर वेगानं धावत होती. तर नव्या जमान्याची ट्राम ही तासाला ६० किलोमीटर वेगानं धावणार आहे. अंतर्गत मेट्रो गुंडाळण्यामागे या रेल्वेवर होणारा खर्च असून अंतर्गत मेट्रोच्या तुलनेत ट्रामवर होणारा भांडवली खर्च कमी असल्याचं सांगितलं जातं. ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पात २२ स्थानकं होती आणि अंतर्गत मेट्रोचा मार्ग हा २९ किलोमीटरचा होता. अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा मेट्रो ४ आणि मेट्रो ५ ला जोडला जाणार होता पण आता अंतर्गत मेट्रोऐवजी हायस्पीड ट्राम उभारली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading