ठाण्यातही कारगिल विजय दिवस साजरा

देशभरा प्रमाणेच ठाण्यातही आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धामध्ये कारगिल वर विजय प्राप्त करून भारताने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं, तो आजचा दिवस. आज या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा सेनिक कार्यालयातर्फे आज प्रथमच निवृत्त सैनिकांच्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निवृत्त सैनिकांच्या संमेलनात निवृत्त सैनिकांनी आपल्या समस्या अडचणी मांडल्या, त्याला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी उत्तरे दिली. जिल्ह्यामध्ये सैनिकी शाळा असावी, सैनिकांसाठी आरोग्य केंद्र असावं, महापालिकेनं सैन्यदलातील लोकांना कर माफ केला आहे मात्र हा कर वैयक्तिक भरल्यास मिळतो सोसायटी तर्फे भरल्यास मिळत नाही तसेच घर घेताना आर्थिक अडचणीमुळे कर्ज घेतल्यास कर्जावर प्रथम नाव सैनिकाच येत नाही त्यामुळे अशा सवलती मिळत नाहीत अशा विविध अडचणी समस्या यावेळी सैनिकांनी माडंल्या. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी समर्पक उत्तर उत्तरे दिली. या कार्यक्रमामध्ये देशासाठी शहीद झालेल्या शहीद सैनिकांच्या विर पत्नीचाही खास गौरव करण्यात आला.
संपूर्ण देशभरात २० वा कारगिल विजय दिवस साजरा होत असताना टीजेएसबी सहकारी बँकेतील वसुली विभागातर्फे मधुकर भवन येथिल कार्यालयामधे हा दिवस साजरा करण्यात आला. टीजेएसबी बँकेच्या वसुली विभाग, आय.टी. विभाग, क्लिअरिंग विभागातील सर्व कर्मचार्यांनी एकत्र जमून कारगिल युध्दातील हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहिली. कारगिल युध्दातील काही महत्वाच्या प्रसंगांची देखिल माहिती देण्यात आली. सामुहिक संपूर्ण वंदेमातरम म्हणून या लहानश्या कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading