ठाण्याच्या राजू तोलानी आणि अजय खरे यांची भारतीय ब्रीज संघात वर्णी

ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन संस्थेचे नामवंत खेळाडू राजू तोलानी आणि अजय खरे यांची एशियन ब्रीज तसेच जागतिक ब्रीज स्पर्धेसाठी निवड झाली. याचे औचित्य साधून ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशनने त्यांचा सत्कार केला. महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष जे. के. भोसले तसेच सचिव हेमंत पांडे यांच्या हस्ते या दोन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. एशियन ब्रीज स्पर्धा चीन मध्ये तर जागतिक स्पर्धा इटली मध्ये होणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव हेमंत पांडे यांनी खास करून आणलेले स्मृतिचिन्ह यावेळी राजू तोलानी आणि अजय खरे यांना प्रदान करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading