ठाण्याच्या अर्जुन  देशपांडेचा यंगेस्ट स्टुडंट इंटरप्रेनर आशिया 2019 या सर्वोच्च पुरस्कारानं गौरव

ठाण्यातील अर्जुन  देशपांडे या 17 बर्ष युवकाची यंगेस्ट स्टुडंट इंटरप्रेनर आशिया 2019 या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड झाली असून नवी दिल्ली येथे झालेल्या शानदार समारोहात त्यांचा यंगेस्ट
स्टुडंट इंटरप्रेनर म्हणून गौरव करण्यात आला. ठाण्यात राहणारा अर्जुन राजेश देशपांडे याने जनरीक आधार ही सर्वसामान्य माणसांना परवडणारी औषधांची दुकाने ठाणे शहर परिसरात सुरु केली.
सर्वसामान्य नागरीकांना 60 टक्के कमी दरात आणि परवडणाऱ्या दरात औषधे मिळू लागल्याने अर्जुन देशपांडे यांनी जनरिक आधार ठाणे मुंबईसह देशभरात मेडिकल स्टोअर्सची रिटेल आऊटलेट
सुरु करण्याची योजना आखली आणि त्याला मूर्त स्वरुप येऊ लागले त्याचीच दखल घेत भारतातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार अर्जुन देशपांडे याला मिळाला आहे. नवी दिल्लीत झी बिजनेस
इंटरप्रेनर इंडिया आणि इंटरप्रेनर मॅगझीन यांच्यातर्फे अनेक प्रतिष्ठीतांच्या उपस्थितीत झालेल्या या सन्मान सोहळयात आशिया खंडातील दोनशे विविध व्यावसायिक स्पर्धक सहभागी झाले होते.
त्यातुन पहिल्या पाच जणांमध्ये अर्जुन देशपांडे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर प्रथम क्रमांकाने त्याचा गौरव करण्यात आला. ठाणेकर असलेल्या अर्जुन देशपांडे यांच्या रुपाने महाराष्ट्राला हा
पुरस्कार प्रथमच लाभला आहे. अर्जुनची आई आरती देशपांडे इंटरनॅशनल फार्मा व्यवसायात असून अमेरिका, व्हियेतनाम, चीन, दुबई येथे होणऱ्या विविध आंतरराष्ट्रीय फार्मा परिषदेस अर्जुन
आपल्या आईसमवेत जात असे. तेथील जनरिक औषधे कमी किंमतीत मिळत असल्याचे पाहून भारतातही ही औषधे उपलब्ध करुन देण्याचे अर्जुनने ठरविले आणि त्याला त्याची आई आरती तसेच
वडील राजेश देशपांडे यांनी साथ दिली. त्यातून जनरिक आधारचे जाळे विणले गेले. अर्जुनचे वडील राजेश देशपांडे वाहतुक व्यवसायात असून ठाणे सीकेपी संस्थेचे अध्यक्ष आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading