ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फळसळकर यांनी स्वत: रस्त्यावर उतरत ठाणेकरांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

ठाणेकर एकीकडे नववर्षाच्या स्वागतामध्ये गर्क असतानाच ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फळसळकर यांनी स्वत: रस्त्यावर उतरत ठाणेकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या पोलीस आयुक्तांनी रस्त्यावर उतरून ठाणेकरांमध्ये मिसळत त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील मासुंदा तलाव येथे नववर्ष साजरं करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ठाणेकरांची गर्दी होते. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर रात्री उशिरा मासुंदा तलावावर आले होते. त्यावेळी नववर्ष साजरं करण्यात गर्क असलेल्या ठाणेकरांच्या भेटी घेत त्यांच्याशी बातचित करत त्यांनी ठाणेकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी ठाणेकरांबरोबर छायाचित्रंही काढली. येणारं नववर्ष ठाणेकरांना सुरक्षिततेचं जावं या उद्देशानं पोलीस आयुक्तांनी ठाणेकरांच्या भेटीगाठी घेत या शुभेच्छा दिल्याचं सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading