शिवसेनेनं काल नव्या नेत्यांची नेतेपदी नियुक्ती केली असून यामध्ये ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची नेतेपदी नियुक्ती केली आहे. नेते पदी नियुक्ती झाल्याची घोषणा झाल्यावर खासदार राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केलं. आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचेही आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली आपण कायम शिवसेना सोबतच राहू अशी बाहीही राजन विचारे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिली.