ठाणे शहर मतदारसंघातून अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर विजयी

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर हे विजयी झाले आहेत. जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे अवघे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मुख्य लढत ही संजय केळकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांच्यात झाली. सुरूवातीपासूनच संजय केळकर निवडून येणार हे स्पष्ट होतं. मात्र केळकर यांना अविनाश जाधव यांनी चांगलीच झुंज दिली. अविनाश जाधव तुलनेनं अनुभवात कमी पडले. मात्र एकप्रकारे हा धोक्याचा इशारा समजला जातो. संजय केळकर यांना ९२ हजार २९८ मतं मिळाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना ७२ हजार ८७४ मतं मिळाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading