ठाणे शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची ठाण्यातील एका विद्यार्थ्याची आयुक्तांकडे विनंती

ठाणे शहर प्लास्टिक मुक्त आणि पर्यावरण युक्त स्वच्छ सुंदर ठाणे शहर होण्याकरीता ‘प्लास्टिक रिसायकल मशिन्स व क्रर्शिंग मशिन्स’ पुन्हा लावाव्यात आणि ‘कापडी पिशव्या’ उपलब्ध करून देणाऱ्या मशिन्स सुध्दा ठाण्यातील वाढते प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण रोखण्यासाठी सर्वत्र लावाव्यात अशी विनंती अथर्व वगळ या विद्यार्थ्याने आयुक्तांकडे केली आहे. त्यावर आयुक्तांनी याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल असं आश्वासन त्याला दिलं आहे. अथर्व हा हिंदी-मराठी चित्रपट आणि सिरीयल मध्ये काम करणारा एक बालकलाकार असून सुलोचनादेवी सिंघनिया स्कूलमध्ये ८ वीत शिकत आहे. “ठाणे शहर स्वच्छ” आणि “सुंदर पर्यावरण युक्त” आणि प्लास्टिक मुक्त सुंदर ठाणे शहर” व्हावे या करीता कधी मान्यवर कलाकारांसोबत व्हिडीओ संदेश द्वारे , सोशल मीडियावर सिंगल युज बंद प्लास्टिक आणि प्लास्टिक पिशव्या वापरू नये जनजागृती , तर कधी टेंभी नाक्यावरील ठाण्याची दुर्गेश्वरी गाण्यातून तर कधी शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून आणि इतरही अनेक प्रकारे प्लास्टिक बंद जनजागृती मोहीम वर्ष २०१८ पासून सर्वत्रच यशस्वीरित्या राबवत आहे. ठाण्यात सुद्धा मुंबई प्रमाणे “प्लास्टिक रिसायकल मशिन्स” आणि “प्लास्टिक बॉटल्स क्रशिंग मशिन्स” लावण्यात याव्यात अशी विनंती त्याने पर्यावरण मंत्री, महापौर आणि आयुक्तांकडे केली होती. तेव्हा त्याच्या या मागणीची दखल घेऊन प्लास्टिक बॉटल्स रिसायल / क्रर्शिंग मशिन्स महापालिका परिसरात काही ठिकाणी बसविल्या होत्या परंतु त्यानंतर कालांतराने त्या बंद अवस्थेत सर्वत्रच दिसत होत्या. ठाण्यात ही मोहिम पुन्हा सुरू करावी, प्लास्टिक मुक्त परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता होल्डींगवर , बॅनर वर , बस स्टॉप वर प्लास्टिक पिशव्या वापरू नये यासाठी जनजागृती करावी. अशी मागणी त्याने केली आहे. प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी आपल्या घरातील ‘बंद प्लास्टिक पिशव्या , प्लास्टिक बॉटल्स , सिंगल युज प्लास्टिक’ आपल्या शाळेच्या आवारात किंवा मुख्य प्रवेशद्वारा जवळ एका ठिकाणी आणून त्या त्यांनी जमा कराव्यात आणि मोक्याच्या ठिकाणी बाजारपेठ, स्टेशन परिसर अशा अनेक ठिकाणी पैसे टाकून ‘कापडी पिशव्या’ देणारे मशीन बसवण्यात यावेत जेणेकरून प्लास्टिकच्या पिशव्या चा वापर बंद होईल आणि पर्यावरण पुरक कापडी पिशव्याचा वापर पुन्हा सुरु होऊन ‘ठाणे प्लास्टिक मुक्त सुंदर पर्यावरण युक्त’ होण्यास मदत होईल अशी विनंती त्याने आयुक्तांकडे केली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading