ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या संकेतस्थळाचं लोकार्पण

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या संकेतस्थळाचं लोकार्पण आज करण्यात आलं. www.thanepolice.gov.in/ हे नुतनीकरण केलेले संकेतस्थळ आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केल्यानं ते मोबाईल, आयपॅड यासारख्या उपकरणांमध्ये चालू केले जाऊ शकते. तसंच यामध्ये सायबर सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे. हे संकेतस्थळ इंग्रजी आणि मराठी भाषेत तयार करण्यात आलं आहे. यामध्ये तक्रार आणि गोपनीय माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी, विविध कार्यालयं आणि पोलीस ठाणी यांचे संपर्क क्रमांक तात्काळ उपलब्ध होतील. विशेषत: अंध व्यक्तींनाही हे संकेतस्थळ वापरण्यास सोपे आहे. हरवले आणि सापडले या टॅबवरून नागरिकांना अतिमहत्वाची वस्तू हरवले आणि सापडल्याची माहिती पोलीसांना देता येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading