ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचं आयोजन

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिनाच्या निमित्ताने काल पत्रकार दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी वर्षभरात पुरस्कार प्राप्त सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपण ठाण्यातील पत्रकारांच्या संघर्षाचा काळ बघितला आहे आपल्यामध्ये एकी असणे गरजेचं आहे ती असेल तर आपण कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकतो असं मत दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी यांनी व्यक्त केलं सर्वानी एकत्र येऊन जर एखाद्या विषयाला वाचा फोडली तर त्याची दाखल शासन दरबारीही घ्यावी लागते हे सत्य आहे. एखाद्या चुकीच्या बाबीचा सर्वानीच विरोध करणे गरजेचं आहे तीच खरी निर्भीड पत्रकारिता आहे असं म्हापदी यांनी सांगितलं.
पत्रकारिता हि तारेवरची कसरत आहेवृत्तसंकलन करत असतांना पत्रकार वेळ काळ तहान भूक विसरून काम करत असतो पण कामाची वेळ पाळताना त्यांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजचे आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपली तब्येत तंदुरुस्त असेल तर आपण सर्वकाही करू शकतो असं दैनिक जनमुद्राचे संपादक दीपक दळवी यांनी सांगितलं. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी पत्रकार संघाच्या स्थापनेपासून जो संघर्ष करावा लागला त्याला तोंड देत संघाने जी आजपर्यंतची मजल मारली त्याची माहिती यावेळी दिली तर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राहुल लोंढे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागात जाऊन वृत्तसंकलन  करून तेथील लोकांच्या समस्या कशा प्रकारे मांडाव्यात याची माहिती दिली यावेळी त्यांनी आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागात ज्या समस्या आहेत त्या आपल्या माध्यमातून कशा पुढे आणण्याकरिता प्रयत्न करावे असे सांगितले. यावेळी प्रशांत सिनकर, सचिन देशमाने, रोहिणी दिवाण अनुपमा गुंडे, युनिस खान, अमोल कदम, विभव बिरवटकर, संदीप खर्डीकर, दीपक कुरकुंडे, गजानन हरिमकर, गणेश पारकर, दिनेश वर्मा आदी पत्रकारांचा त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading