ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून २४ तास बंद राहणार आहे.
स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कं.प्रा.लि यांचे मार्फत देखभाल दुरूस्ती आणि इतर विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे उद्या सकाळी ९ वाजल्यापासून शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील उपलब्ध पाणीपुरवठा झोनिंग करुन ठाणे शहरात वितरित करण्यात येणार आहे. परिणामी उद्या सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर, गांधीनगर या भागात पाणीपुरवठा बंद राहील तसेच उद्या रात्री ९ ते शनिवार सकाळी ९ वाजेपर्यत ऋतू पार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, समतानगर, आकृती, दोस्ती, जॉन्सन, इटर्निटी, कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहील. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading