ठाणे लोकसभा मतदारसंघात संपूर्णत: महिलांनी नियंत्रित केलेली १५ सखी मतदान केंद्र तर दिव्यांगांनी नियंत्रित केलेली ५ सक्षम केंद्र

येत्या सोमवारी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात १५ सखी केंद्र तर ५ सक्षम केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. या सखी केंद्रांमध्ये निवडणूक प्रक्रिया संपूर्णत: महिला कर्मचारी हाताळणार आहेत. अगदी शिपायापासून मतदान केंद्र अधिका-यापर्यंत सर्व काम हे महिलांवर सोपवण्यात आल्याचं जिल्हा निवडणूक अधिका-यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे ठाणे लोकसभा मतदारसंघात ५ सक्षम केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. या ५ सक्षम मतदान केंद्रात निवडणूक प्रक्रिया ही संपूर्णत: दिव्यांग कर्मचारी हाताळणार आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात अशी १२ महिला सखी केंद्र निर्माण केली जाणार आहेत. ठाण्यातील १५ पैकी ६ सखी केंद्र ही डॉ. बेडेकर विद्यामंदिर येथे आहेत असं यावेळी जिल्हा निवडणूक अधिका-यांनी सांगितले. मतदान झाल्यानंतर मतपेट्या ठेवण्यासाठी ३ स्ट्राँग रूम बनवण्यात आल्या असून याठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तसंच क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पेट्यांच्या जवळ पहिली सुरक्षा ही केंद्रीय राखीव पोलीस दलाची असेल त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी आणि त्यानंतर राज्याचे पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले जाणार आहेत. मतपेट्या जिथे ठेवल्या जाणार आहेत त्या ठिकाणी लावलेलं सील तपासण्यासाठी गॅझेटेड ऑफीसर तैनात करण्यात येणार असून हे दिवसभरात तीनदा सीलची तपासणी करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading